पुणे

विद्यार्थ्यांनो आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जा उज्वल यश मिळेल :मलकप्पा भरमशेट्टी, कल्याणशेट्टी प्रशालेच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प

CD

AKK26B05886
अक्कलकोट : येथील सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देताना मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी व मान्यवर.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला
सामोरे जावे : मलकप्पा भरमशेट्टी
..........
अक्कलकोट, ता. २० : दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास अन् सकारात्मक विचाराने पेपर चांगले लिहून उज्वल यश संपादन करावे असा संदेश मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अक्कलकोट परिसरातील विद्यार्थ्यांची सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाच्या केंद्रात दहावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी परिक्षार्थींना गुलाब पुष्प देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, श्री जगताप उपस्थित होते. श्री भरमशेट्टी म्हणाले, आज गुलाबपुष्प देऊन तुमचे स्वागत करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत आहे. गुलाबाच्या सुगंधासारखी तुमची यशाची कीर्ती दरवळो आणि त्यांच्या कोमल पाकळ्यांसारखे तुमचे स्वप्न साकार होवोत. शांत मन, एकाग्रता आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब करून पेपरमध्ये उत्तरे लिहिल्यास यश मिळते. परीक्षेची भीती न बाळगता धैर्याने प्रत्येक प्रश्नाला सामोरे जा असे ते म्हणाले.

चौकट:
परीक्षेसाठी कडक बंदोबस्त
दहावीच्या परीक्षेसाठी भरारी पथकासह पोलिसांचा कडक बंदोबस्त विद्यालयाच्या परिसरात तैनात करण्यात आला आहे असे मुख्याध्यापक भरमशेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT