पुणे

ग्राहक सेवा, हानी कमी करणे व शंभर टक्के वीजबिल वसुलीवर भर ः औंढेकर यांचे निर्देश

CD

ग्राहक सेवा, हानी कमी
करून वीजबिल वसुलीवर भर

शंभर टक्के वीजबिल वसुलीचे संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देणे, वितरण व वाणिज्यिक हानी कमी करणे तसेच वितरित केलेल्या वीजबिलांची शंभर टक्के वसुली करणे, या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निर्देश संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले.
अकोला येथील विद्युत भवनात अकोला परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंते राजेश घाटोळे, धनंजय अहेर, संदीप दरवडे, दीपक सोनोने यांच्यासह विभागीय कार्यकारी अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित होते.
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे औंढेकर यांनी सांगितले. फिडर सेपरेशनची उर्वरित कामे गतीने पूर्ण करून कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत यासाठी फॉल्टी अथवा रिडिंग न होणारे मीटर तातडीने बदलून स्मार्ट मीटर बसवावेत. प्रलंबित वीजजोडण्या त्वरित देऊन कामातील निष्काळजीपणा टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यावर भर द्यावा. थकबाकीदारांवर नियमानुसार कारवाई करून वीजचोरीविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देशही औंढेकर यांनी दिले.

अकोला ः येथील विद्युत भवनात आढावा घेताना संचालक (संचालन) धनंजय औंढेकर. शेजारी मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT