अकलूज येथे शनिवारपासून लावणी नृत्य स्पर्धा
दोन दिवस स्पर्धा; प्रथम क्रमांकास तीन लाख रुपये आणि स्मृती चषक
सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. २१ : ढोलकीची थाप, त्याला घुंगराची साथ, सोबतच पेटीच्या संगतीने पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांनी नर्तिकींच्या पारंपारिक पदण्यासाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ''राज्यस्तरीय लावणी स्पर्धा'' शनिवार (ता. २८) व रविवार (ता. १ मार्च) रोजी शंकरनगर येथील स्मृतिभवनच्या रंगमंचावर होणार आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने दोन दिवशीय राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे सुभाष दळवी, महादेव अंधारे, अशोक जावळे, विजय दोशी, पोपट भोसले-पाटील, बिभीषण जाधव, संजय गळीतकर सुहास थोरात, सतीश यादव उपस्थित होते. सहकार महर्षी जयंती समारंभ समितीच्या वतीने १९९३ साली सुरू केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धा संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी २०१८ पर्यंत अविरतपणे घेतल्या. कोरोना काळात बंद ठेवलेल्या या स्पर्धा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी २०२४ पासून पुन्हा जोमाने सुरू केल्या. या स्पर्धेमुळे लावणी कलाकारांना चित्रपट, रियालिटी शोमधून तसेच परदेशातही संधी मिळाली.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास तीन लाख, द्वितीय क्रमांकास दोन लाख, तृतीय क्रमांकास एक लाख व स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट नृत्यांगना ५ हजार व कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील स्मृतिचषक, उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) ५ हजार, उत्कृष्ट मुजरा ३ हजार, उत्कृष्ट ढोलकीपटू, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक, उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहेत.
-----
स्पर्धेतील सहभागी पार्ट्या
शनिवार (२८ फेब्रुवारी) रोजी
- वैशाली समसापूरकर, जयअंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी
- काजल-स्वाती जळगावकर अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा, जि. अहिल्यानगर
- बेला, श्रद्धा नेटूरकर जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी, पंढरीचापूल, जि. अहिल्यानगर
- अपर्णा, कीर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी, जि. पुणे
- गीता, श्रुती वाईकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकूळ शिरगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर
रविवार (ता. १ मार्च) रोजी
- छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
- जोत्स्ना वाईकर, पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे, ता. वाई, जि. सातारा
- नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर
- राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत, चौफुला, जि. पुणे
- वैष्णवी कोल्हापूरकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
- न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत चौफुला, जि. पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.