पुणे

अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते पीएम सूर्य घर मोफत योजनेमुळे वीज बिल शून्यावर

CD

अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते
--
पीएम सूर्य घर मोफत योजनेमुळे वीज बिल शून्यावर
---

अकोला : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या अकोला परिमंडळातील वीज ग्राहक पर्यावरणपूरक सौर ऊर्जेकडे मोठ्या प्रमाणात वळत असून, परिमंडळातील तब्बल ३३ हजार ३८०ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वतःच्या गरजेची वीज स्वतःच निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे संबंधित ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत कमी झाले असून, त्यांना आर्थिक बचतीसह हरित ऊर्जेचा लाभ मिळत आहे.
महावितरणकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलडाणा), अजय शिंदे (वाशीम) आणि प्रतिक्षा शंभरकर (अकोला) यांच्या पुढाकाराने ग्राहकांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, तांत्रिक मार्गदर्शन तसेच नेट मीटरिंग सुविधा जलदगतीने उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्राहकांचा या योजनेकडे प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
महिन्याला ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प स्थापनेस प्रोत्साहन म्हणून प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार पहिल्या दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी १८ हजार रुपये, असे एकूण ७८ हजार रुपयांचे अनुदान ग्राहकांना उपलब्ध होते. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. तसेच सौर प्रकल्प उभारणीसाठी बँकांमार्फत कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---
चौकट
वीजग्राहक सक्षम
३३ हजार ३८० ग्राहकांमध्ये अकोला जिल्ह्यातील १२ हजार ८६४, बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार ५७६ आणि वाशीम जिल्ह्यातील ५ हजार ९४० ग्राहकांचा समावेश आहे. या योजनेमुळे वीज ग्राहक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, पर्यावरण संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT