पुणे

अकोल्यात सोयाबीनला विक्रमी दर; बियाणे दर्जाचे सोयाबीन साडेसात हजारांपर्यंत

CD

पान २

अकोला बाजार समितीत
सोयाबीनला विक्रमी दर

बियाणे दर्जाचे सोयाबीन साडेसात हजारांपर्यंत

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, मंगळवारी (ता. १२) बियाणे दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल ७,५०० रुपये, तर नियमित सोयाबीनला ७,४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, अकोल्यात सोयाबीनला गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक दर मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीचा परिणाम आणि सोयाबीनच्या उपलब्धतेतील मर्यादा यामुळे बाजारात दरवाढीचा कल अधिक तीव्र झाला आहे. सोमवारी (ता. ११) अकोला बाजार समितीत सोयाबीनला किमान ६३०० रुपये आणि कमाल ६,७९५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र अवघ्या एका दिवसात दरात लक्षणीय वाढ होत दर ७,५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही लक्ष या बाजाराकडे लागले आहे.
सध्या बाजार समितीत दररोज अंदाजे दीड हजार ते दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. बाजारात विक्रीसाठी येणारा बहुतांश माल हा शेतकऱ्यांनी काही महिन्यांपासून साठवून ठेवलेला आहे. काही खरेदीदारांनी तर मागील दोन ते तीन वर्षांपासून साठवलेले सोयाबीनही वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. दरवाढीमुळे शिल्लक साठा हळूहळू बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या मते, नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात येईपर्यंत हाच साठा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी येत राहणार आहे. त्यामुळे आगामी काळातही बाजारातील दराचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.
सोयाबीनच्या या दरवाढीमुळे थोड्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असला, तरी ९० टक्क्यांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन विकून झाल्यानंतर ही दरवाढ सुरू झाली. दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही उत्पादक योग्य वेळेची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.


कोट
सध्याच्या दरवाढीचे कुठलेही एक नेमके कारण दिसत नाही. मात्र, मागील पाच-सहा वर्षांतील सर्वाधिक दरांपर्यंत सोयाबीन पोचले आहे. सध्या साठवून ठेवलेले, काही मोजक्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येत आहे. खेड्यापाड्यातील छोट्या खरेदीदारांचाही माल आता येऊ लागला आहे.
- चंद्रकांत पाटील,
अडते, बाजार समिती अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली? सोशल मीडियावरील मेसेजबाबत स्वत: मुंढे यांनी दिलं स्पष्टीकरण

'मी ज्या मैदानावर खेळले तिथेच माझं मुलही...' जेनिलिया देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली...

Meta AI on WhatsApp: इमेज जनरेशन ते ट्रॅव्हल प्लॅनिंग! 'मेटा AI' ची ५ भन्नाट फीचर्स जी तुम्ही व्हॉट्सॲपवर वापरू शकता!

Rickshaw-Taxi Fare Hike: रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार; किती भाडे वाढणार?

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये CJP पथकावर हल्ल्यानंतर भाजप आमदाराची खोचक टीका; म्हणाले, ‘घरात झुरळाचा काही उपयोग नसतो’

SCROLL FOR NEXT