पुणे

नवीन विहीर, कूपनलिका खोदण्यास बंदी व्यावसायिक पाणी उपशावरही निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

CD

अकोला जिल्ह्यात नवीन विहीर,
कूपनलिका खोदण्यास बंदी

व्यावसायिक पाणी उपशावरही निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहावेत, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश ३ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटरच्या परिघात खासगी अथवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहीर किंवा कूपनलिका खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता उत्खनन केल्यास संबंधित मशीन व साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
तसेच, जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या शासकीय जलप्रकल्पांसह नद्या, नाले आणि बंधाऱ्यांमधून उद्योग अथवा व्यावसायिक कारणांसाठी पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आणि टँकर भरण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंत्राटदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ नुसार कारवाई केली जाणार आहे. संबंधितांचे पंप, पाइपलाइन किंवा बोअरवेल मशीन जप्त करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस तसेच नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

PM Modi On Nana Patekar : 'त्यांनी कधीच संकोच बाळगला नाही...'; नानांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचे शब्द चर्चेत, म्हणाले...

लोकं म्हणतील नानाचा मुलगा असा कसा? दुसऱ्या मुलाचा तिरस्कार करायचे नाना, आयुष्यभर मनात राहिली ती सल

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधात पिंपरी-चिंचवड शहरात इंडिया आघाडीचा मोर्चा

Pune Municipal Corporation: अटी बदलल्या लुटमार वाढणार; पुणे महापालिकेच्या नगरसेवकांकडून धोरणात्मक निर्णयाला फाटा

SCROLL FOR NEXT