पुणे

बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अकोल्यातच करा अहिल्या एकल हक्क संरक्षण समितीची आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सह प्रशासनाकडे मागणी

CD

‘‘बालसंगोपन’ची पडताळणी अकोल्यातच करा’
अकोले, ता. १८ ः राज्य सरकारच्या एकल महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्चासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘बालसंगोपन योजने’अंतर्गत लाभार्थी महिला व संबंधित व्यक्तींची पडताळणी अकोले येथेच करण्यात यावी, अशी मागणी अकोले तालुका अहिल्या एकल हक्क संरक्षण समितीच्या वतीने आमदार डॉ. किरण लहामटे व प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
अहिल्या एकल हक्क संरक्षण समिती यांनी या प्रश्नाच्या संदर्भात आमदार डॉ. किरण लहामटे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले असून, त्यांनी या संदर्भात त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, सध्या अकोले विधानसभा मतदारसंघातील एकल महिला व त्यांच्या मुलांना बालसंगोपन योजनेसाठी चौकशी व पडताळणीकरिता अकोलेपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिल्यानगर येथे जावे लागत असल्याने लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक एकल महिला रोजंदारीवर किंवा शेतीच्या कामावर अवलंबून असल्याने त्यांना चौकशीसाठी दूरवर जाणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरत आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळविताना महिलांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले.
प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीच्या ज्योत्स्ना देशमुख, सिंधू धोंगडे, नीता डावरे, छाया चौधरी, छाया पोटे, सुनीता पडवळ, पूजा गोसावी, सुवर्ण गडगे, ज्योती वाकचौरे यांनी केली आहे. या प्रकरणी महिला व बालकल्याणमंत्र्यांची भेट घेऊ, असे यावेळी आमदार डॉ.लहामटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT