पुणे

धरणांचे आवर्तन सोडताना बैठक का घेतली नाही? आमदार लहामटे आक्रमक

CD

आवर्तन सोडताना बैठक का घेतली नाही
आमदार लहामटे यांचा सवाल ः अकोलेकरांना हक्काचे पाणी देण्याची मागणी
अकोले, ता. २० : तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही अकोलेच्या हक्काचे पाणी मिळण्यात अडथळे का येत आहेत, असा सवाल आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उपस्थित केला. धरणांचे आवर्तन सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक घेणे अपेक्षित असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक न घेताच आवर्तन सोडण्याचे आदेश दिल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोमवारी (ता. १९) झालेल्या बैठकीत आमदार लहामटे, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींनी अकोले तालुक्याच्या पाणीप्रश्नावर चर्चा केली. मात्र, बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, प्रदीप हाफसे व हाडरे गेहराज बैठकीला गैरहजर राहिल्याने उपअभियंता जगदीश दरोडे व प्रतीम शेवाळे यांना पाठविण्यात आले होते. तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याचा मुद्दा आमदार लहामटे यांनी उपस्थित केला. निळवंडे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करताना अकोले तालुक्याच्या गरजांचा विचार केला जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.
निळवंडे धरणात सुमारे ७ हजार ८२० टीएमसी पाणीसाठा असल्याचा उल्लेख करत, त्यातील लाभक्षेत्रासाठी राखीव पाण्याच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ऊर्ध्वप्रवाहातील कालव्यांमधून अकोले तालुक्याला पाणी देण्याबाबत स्पष्ट नियोजन दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील ३२ गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच सुमारे ४०० शेततळ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी आमदार लहामटे यांनी केली.
कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणीवाटपाचे नियोजन करणे आवश्यक असताना थेट आवर्तन सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याच्या नियोजनात अकोले तालुक्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
---------------
बैठक न घेताच आवर्तन सोडल्याचा आरोप
भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात साठविण्यासाठी सोडून लोअर व ऊर्ध्वस्तरीय कालव्यांद्वारे अकोले तालुक्याला आवर्तन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने आमदार लहामटे यांनी प्रशासनाला जाब विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSनंतर IPS झाले, पुढे एक वर्षात IAS बनले; आता राज्यातून केंद्रात मोठी जबाबदारी, २ अधिकाऱ्यांची बदली

Salman Khan: सलमान खानने बिष्णोई समाजाची माफी मागणार का? 'भाईजान'ला कोणी दिला सल्ला?

Pradeep Purnekar Case: टल्ली, पपलूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ, गुन्ह्यातील शस्त्रे, हेल्मेटचा शोध; तपासातील गोपनीय नोंदीने चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ मुंबईत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत!

Shafali Varma: शफाली वर्मावर ICC ची करवाई! झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रागात केलं होतं चुकीचं कृत्य, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT