पुणे

आळंदीकरांसाठी सुखद धक्का

CD

आळंदी, ता. २७ : आळंदी नगरपरिषदेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १२३ कोटी २४ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प गुरुवारी (ता. २६) विशेष सभेत मंजूर केला. नागरिकांवर कोणतीही नवीन करवाढ न लादता पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर यात भर देण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकासावर विशेष लक्ष या अर्थसंकल्पात असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २६) झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प संमत करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर आणि नगरसेवक नगरसेविका, प्रशासकीय सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांची उपस्थिती होती. अर्थसंकल्पाबरोबरच सभेमध्ये भुयारी गटार बांधणे, एसटीपी संबंधित कामे करणेबाबत, रस्ते विकास योजने अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील रस्ते करणे, पाणीपुरवठा योजनाचे अंदाजपत्रक तयार करणे असे विषय मंजूर करण्यात आले. महसूली २९. ५४ कोटी रुपये आणि भांडवली उत्पन्नाद्वारे ९३.६३ कोटी रुपये मिळून १२३ कोटी १७ लाख रुपये अपेक्षित जमा अर्थसंकल्पात धरण्यात आली. त्यामध्ये आरंभीची सहा लाख ६५ हजार रक्कम जमा धरून चालू वर्षाचा एकूण १२३.२४ कोटींचा आर्थिक अहवाल तयार केला. तर १२३.१८ कोटी रुपये एकूण खर्च खागविण्यात आला.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामे योजनामधून २० कोटी, विशेष योजना अनुदान ४ कोटी, १५ वा वित्त आयोग ३ कोटी, सुवर्णजयंती नगरोत्थान योजना ९ कोटी, नागरी दलित्तोर सुधारणा योजना २ कोटी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २ कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान २ कोटी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान २ कोटी, नागरी क्षेत्रातील सेवा व सुविधा योजना ५ कोटी, विशेष रस्ता अनुदान ३ कोटी, रस्ता अनुदान २ कोटी, इंद्रायणी नदी प्रदुषण उपाययोजना ३ कोटी, नमामी इंद्रायणी अंतर्गत कामे ३.५० कोटी असे एकूण ९३.६३ भांडवली जमा धरण्यात आले आहेत. ३०.३३ कोटी महसूली खर्च आणि ९२.८४ कोटी भांडवली खर्चाचे नियोजन अर्थसंकल्पात केले आहे. यामध्ये महसूली खर्चामध्ये सर्वाधिक तरतूद सफाई ठेकेदारीसाठी ३.४० कोटी, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांसाठी २.४० कोटी, आस्थापना वेतन २ कोटी, पाणीपुरवठा व दिवाबत्ती वीजबिलासाठी १.२० कोटी, रस्ते दुरुस्ती १ कोटी, शाळा इमारत दुरुस्तीसाठी केवळ ०.८० कोटी तर ९२.८४ कोटीच्या भांडवली खर्चामध्ये प्रामुख्याने रस्ते डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकसाठी ४ कोटी, विकास शुल्काअंतर्गत कामासाठी ३ कोटी भूमीगत गटार योजनेसाठी १.५० कोटी, ठेका पद्धतीने पथदिवे देखभालीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महसूली उत्पन्न
मालमत्ता कर : ५.५५ कोटी
सर्वसाधारण पाणीपट्टीद्वारे : ०.६० कोटी
साहाय्यक अनुदान : ५.३६ कोटी
यात्रा अनुदान : ६ कोटी
विकास शुल्क : २ कोटी
प्रिमियम शुल्क : ०.४५ कोटी
भाजी मार्केट दैनंदिन उत्पन्न : ०.१६ कोटी
नळ जोडणी शुल्क : ०.२० कोटी
एकूण २९.५४ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT