alandi news
alandi news sakal
पुणे

Alandi News : आळंदीत कडकडीत बंद; माऊलींच्या सानिध्यात राहुनही मंबाजीची भुमिकेत विश्वस्त

विलास काटे

आळंदी : वारकरी आणि आळंदीकर एकच कुटुंबातील असल्याने वारीसाठी आलेल्या वारकर्‍यांची कोणतीच गैरसोय आजच्या बंदने होणार नाही. मात्र देवस्थान समितीमधे काम करताना सात वर्षे माऊलींच्या सानिध्यात राहुनही काही लोक आजही मंबाजीच्या भुमिका पार पाडत आहेत.

आळंदी गावाला बदनाम करण्याचे काम जाणिवपुर्वक केले जात आहे. देवस्थानची घटना ब्रिटिश कालीन आणि कालबाह्य झाल्याने हा संघर्ष करावा लागत आहे. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जावुन आळंदीकरांच्या हक्कासाठी संघर्षाची भुमिका कायम ठेवणार असल्याचे आळंदीकरांनी एकजुटीने निर्णय घेत सांगितले.

दरम्यान आळंदीकरांनी केलेला बंद आणि मागण्याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार राम बिजे यांना दिले. आळंदी देवस्थान विश्वस्त समिती निवडीबाबत आक्षेप आणि आळंदीकरांना समितीमधे स्थान नसल्याने शहरात ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवुन निषेध फेरी काढुन कडकडित बंद पाळला.

ऐन कार्तिकी वारीत आळंदीकर ग्रामस्थांकडून पाळण्यात आलेला बंदसाठी महाद्वार,चावडी चौक,प्रदक्षिणा रस्त्यासह सर्वच दूकाने बंद होती.चाकण चोकातुन निषेध फेरी काढुन महाद्वारात सभा घेतली.यावेळी अनेकांनी भाषणे केली.

यावेळी आळंदीकर म्हणाले, आळंदीकरांची मागणी घटनाबाह्य नाही. व्यवस्थेतील लोकंाकडुन आळंदीकर आणी वारकर्‍यांमधे जाणिवपुर्वक संभ्रम निर्माण केले जात आहे. सन १८५२ पासुन आळंदीकरांचा संघर्ष आहे. पिढ्यानपिढ्या आळंदीकरांनी आळंदीत येणार्‍या वारकर्‍यांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची सेवा केली आहे.

यामुळेच अनेकांना देवस्थानकडुन मानही दिला जातो.हे देवस्थानचे विश्वस्तांनाही माहीत आहे. यापुर्वी सर्वाच्च न्यायलयही हे मान्य केले आहे. विश्वस्तांच्या शिफारशीवर आधारित नेमणुका

चुकीच्या आहेत. संप्रदायाची परंपरा माहीत नसलेल्याचीच निवड होते.विश्वस्तांबाबत वैयक्तिक हेवेदावे नाहीत,भांडणही नाही. हा न्यायाचा आणि हक्काचा प्रश्न आहे.यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावू. वारीनंतर आंदोलनाची दिशा ठरवु.

आळंदीकरांचे देवस्थान आणि आळंदीसाठी योगदान काय असा सवाल प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केला. या वक्तव्याचा निषेध म्हणुनही ही सभा होती.

आळदीकरांनी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचा आज जाहीर निषेध करुन गावबंदी करणार असल्याचे एकमुखाने महाद्वारातील सभेत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT