पुणे

आळंदीत कोचिंग क्लासेसची झाडाझडती

CD

आळंदी, ता. ५ : दिवेआगर येथे विद्यार्थ्यांसोबत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, आळंदी नगर परिषद प्रशासनाने शहरातील कोचिंग क्लासेसच्या सुरक्षिततेची आणि अधिकृततेची झाडाझडती सुरू केली आहे. यासाठी चार विशेष पथके नेमण्यात आली असून, सोमवार (ता. ५) पासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या तपासणीमुळे अनधिकृत क्लासेसचे धाबे दणाणले आहेत.
नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सोनाली झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होत आहे. प्रत्येक पथकात चार कर्मचारी असून, सोनाली झिंजुर्डे आणि सीमा चारभे यांच्यासह पथके शहरातील सर्व क्लासेसना भेटी देत आहेत. यापूर्वी, विनर्स अकॅडमी हा क्लास अनधिकृत वापरामुळे सील करण्यात आला होता.
या सर्वेक्षणात एकूण १८ मुद्द्यांवर माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये क्लासच्या जागेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, व्यवसाय परवाना, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली जात आहे. तसेच, विद्यार्थ्यांची संख्या, शुल्क रचना आणि शिक्षकांची माहितीही संकलित केली जात आहे. सर्वेक्षणाच्या प्राथमिक टप्प्यात काही ठिकाणी पत्र्याचे शेड आणि अस्वच्छता आढळून आल्याचे समजते. पथकांना दोन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आळंदी शहरामध्ये कोचिंग क्लासेसचे पेव फुटले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अनधिकृत कोचिंग चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही पथके नेमण्यात आली आहेत. सर्वेक्षण झाल्यानंतर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्वेक्षण करणाऱ्या पथकांना दिल्या आहेत.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT