पुणे

ॲकॅडमीतील दोनशे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

CD

आळंदी, ता. ३ : दिवेआगर येथे विनर्स ॲकॅडमी कोचिंग क्लासेसमार्फत गेलेल्या सहलीतील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये कोचिंग क्लास चालक अमर आदक सध्या तेथील पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कोचिंग क्लासमध्ये सध्या शिकत असलेल्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
या ॲकॅडमीमध्ये विविध शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी अकरावी-बारावी सोबत सीईटी, जेईईचे शिक्षण घेत होते. ४० ते ६० हजार रुपये प्रतिवर्ष प्रमाणे शुल्क आकारले जात असल्याचे काही पालकांनी सांगितले.
सध्या दिवेआगर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. कोचिंग क्लास चालक आदक त्यांच्या ताब्यात असल्याने आणि नगरपरिषदेने आळंदीतील कोचिंग क्लासच्या कार्यालय सील केल्याने ते सध्या बंद अवस्थेत आहे. आणखी किती दिवस ही परिस्थिती राहील, याबाबत कोणालाच खात्री नाही. घटनेची तीव्रता पाहता भीतीपोटी कोचिंग क्लास चालक पुन्हा आळंदीमध्ये क्लास सुरू करेल याचीही खात्री नाही. मात्र ज्या पालकांनी मुलांसाठी आगाऊ शुल्क कोचिंग क्लास चालकाला दिले, ते परत मिळणार का, हा प्रश्न कायम आहे. त्याचबरोबर कोचिंग क्लास सुरू झाला नाही तर मुलांचा अभ्यास टांगणीला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालक काहीसे संभ्रमात असल्याचे दिसून येते.

‘‘कोचिंग क्लासचे कार्यालय सील केले आहे, पूर्ण चौकशी होईपर्यंत तेथे क्लास सुरू करता येणार नाही. मात्र पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाकडून केली जाईल. ज्यांनी आगाऊ शुल्क दिले आहे, त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
-माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT