आळंदी, ता. २६ : दिवाळीनिमित्त फटाका विक्रेत्यांसाठी आळंदी नगरपरिषदेने देहू फाटा येथील एस.टी. महामंडळाच्या जागेत २४ गाळे उपलब्ध करून दिले आहेत. अनधिकृत स्टॉल आढळल्यास साहित्य जप्त करून १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खंडेकर यांनी दिली.
नगरपरिषदेने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व स्टॉल एकाच ठिकाणी निश्चित केले आहेत. यासाठी ७,३२१ रुपये परवाना शुल्क असून, यंदा १,७५,७०४ रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. स्टॉलधारकांनी १०० मीटर परिसरात फटाके उडवू नयेत आणि दोन स्टॉलमध्ये किमान ३ फूट अंतर ठेवावे. मुदतीनंतर स्टॉल सुरू ठेवल्यास प्रतिदिन १,००० रुपये दंड आकारला जाईल. पोलिस आणि स्फोटक विभागाची परवानगी घेणे अनिवार्य असून प्रतिबंधित फटाक्यांवर बंदी असेल.
कर निरीक्षक सीमा चारभे म्हणाल्या, ‘‘प्रत्येक स्टॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना, सँड बकेट आणि वीज वितरणाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. दुर्घटनेस सर्वस्वी स्टॉलधारक जबाबदार राहतील.’’
या बाबी बंधनकारक
- निवासी इमारतीत फटाका साठवणूक व विक्रीस सक्त मनाई.
- मैदानावर फायर फायटर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे विक्रेत्यांची जबाबदारी.
- मुदत संपल्यानंतर जागा स्वच्छ करून देणे बंधनकारक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.