पुणे

आळंदीतील आधुनिक बसस्थानक विलंबाच्या विळख्यात

CD

आळंदी, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत आळंदी नगरपरिषद हद्दीतील राज्य परिवहन महामंडळाच्या आळंदीतील जागेवर आधुनिक बसस्थानक व बहुमजली इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाने विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात राज्य परिवहन महामंडळाच्या पूर्वसंमतीशिवाय कोणतेही काम करण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. या भूमिकेमुळे शासनाने मंजूर केलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे आळंदी नगरपरिषद सत्ताधारी गटाचे गटनेते सचिन गिलबिले यांनी सांगितले.
हा प्रकल्प आळंदी तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून दरवर्षी लाखो वारकरी, भाविक आणि पर्यटक आळंदीत येत असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या वाहतूक, निवारा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
याबाबत गटनेते गिलबिले म्हणाले, ‘‘आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये देहू फाटा येथे एसटी महामंडळाची मोठी जागा असून १९९२पासून या ठिकाणी केवळ दोन ते चारच एसटी सुरू आहेत. पुणे, वल्लभनगर आणि चाकण शहराला मध्यवर्ती असलेल्या आळंदीत एसटी सुरू केली तर मोठा फायदा होणार आहे. मात्र एसटी महामंडळ जाणीवपूर्वक या ठिकाणी विकास करत नसल्याचे चित्र आहे.’’
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि मोठ्या शहरांना एसटी वाहतुकीने जोडले जाऊ शकते. पुण्यातील शिवाजीनगर एसटी आगार तसेच वल्लभनगर आणि चाकण एसटी स्थानकाची जागा अपुरी असून एसटी उभ्या करण्यास अडचण आहे. त्याऐवजी या स्थानकातील एसटी आळंदी स्थानकामध्ये मुक्कामी आणल्या तर सर्वांची सोय होणार आहे आणि महामंडळ फायद्यात राहील. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी होणे ही आळंदीतील सर्व नागरिक, वारकरी आणि व्यापारी वर्गाची अपेक्षा आहे.
मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या भूमिकेमुळे शासनाने मंजूर केलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ती आळंदी शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच वारकरी संप्रदायाच्या हिताच्या दृष्टीने निराशाजनक आहे.
शासन, विभागीय आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प कोणत्याही विलंबाशिवाय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी गिलबिले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT