पुणे

आळंदी नगर परिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

CD

आळंदी, ता. ४ : आळंदी नगर परिषदेच्या विविध विभागांतील ४२ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या हाती बोनस आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली असून, यासाठी एकूण ८ लाख ८२ हजारांची तरतूद केली आहे.
नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे यांनी १६ ऑक्टोबर रोजी पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांसाठी बोनसची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेत दिवाळीपूर्वी बोनसचे वाटप केले. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी प्रतिवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये २४ तास कार्यरत असतात. वर्षभर शहराची स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा संकलन, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व इतर अत्यावश्यक नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ते प्रामाणिकपणे मेहनत घेतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयावर समाधान व्यक्त करताना नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे म्हणाले, “ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता कर्मचारी शहराच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यांच्या कष्टाची योग्य दखल घेऊन त्यांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, या भावनेतून ही मागणी केली होती.” प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.

नगर परिषदेचे कर्मचारी हे शहराच्या विकासाचा आणि दैनंदिन नागरी सेवांचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेणे आणि दिवाळीच्या सणात त्यांच्या कुटुंबीयांनाही आनंद मिळावा, या भावनेतून प्रत्येकी २१ हजार रुपये बोनस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

Pune News: चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; 'या' परीक्षांची होणार चौकशी?

SCROLL FOR NEXT