Alandi  Sakal
पुणे

Alandi News : आळंदी पालखी मार्ग पाहणी दौरा; शिवरी तरडगाव वेळापूरमधे उड्डाणपूलालगत सेवारस्त्यांची मागणी

आळंदी पंढरपूर पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम पुढील दोन महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

विलास काटे

आळंदी : आळंदी पंढरपूर पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम पुढील दोन महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र पुणे जिल्ह्यात जेजूरीजवळ शिवरी यमाई, सातारा जिल्ह्यात तरडगाव, सोलापूर जिल्ह्यात वेळापूर येथील उड्डाणपूलाचे बांधकाम पालखीपूर्वी पूर्ण न झाल्यास महामार्गाच्या दोन्ही बाजूने सेवाजोड रस्ता पालखीसाठी चांगला करून द्यावा.

विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाण कळण्यासाठी गावांच्या नावासह दिशादर्शक फलक मोठ्या आकारात पालखी मार्गावर उभे करावेत. पालखी तळावर पिण्याचे पाण्याची सोय आणि विसाव्याच्या ठिकाणी आजूबाजूस जागा आरक्षित ठेवावी, अशी मागणी आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी शासकिय अधिकारी यांना दिली.

अडिच महिन्यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माऊलींच्या पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारी दरम्यान वारक-यांना अधिक सुविधा असाव्यात यासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड राजेंद्र उमाप ,

विश्वस्त योगी निरंजननाथ, दिंडी संघटनेचे पदाधिकारी आणि मानकरी यांनी संयुक्तपणे आळंदी पंढरपूर पालखी मार्गावर रात्रीच्या मुक्कामांचे तळ, दुपारचे विसाव्याचे ठिकाण आणि पालखी महामार्गाची पाहणी केली. यावेळी शासकिय अधिकारी, स्थानिक पदाधिका-यांशी संवाद साधला.

याबाबत माहिती देताना देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजनाथ यांनी सांगितले, पालखी महामार्गावरिल रूंदीकरणाचे बहूतांश काम मार्गी लागले. मात्र शिवरी यमाई, तरडगाव आणि वेळापूर या ठिकाणी उड्डाणपूलाचे काम प्रलंबित आहे.

पालखी सोहळ्यात वारकरी आणि वारक-यांच्या वाहनांना अडथळा होवू नये यासाठी हे काम तातडीने मार्गी लावावे. अन्यथा गैरसोय टाळण्यासाठी वारक-यांना जाण्यासाठी पर्यायी सेवा रस्ता दोन्ही बाजूने करून द्यावा.

वारी काळात शासनाकडून तात्पुरते शौचालये दिले जातात. राज्य तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून लोणंद नातेपुते वेळापूर या तीन तळांवर सुलभ शौचालयांचे काम पूर्ण झाले. ही शौचालये वारी काळात विनाशुल्क वारक-यांसाठी ठेवावीत.

पालखी महामार्ग झाल्यामुळे अनेक ठिकाणी गावांच्या मध्यभागी झालेल्या उड्डाणपूलामुळे गाव आले तरी कळत नाही. चुकामुक टाळण्यासाठी मुक्काम आणि विसावा ठिकाण कळण्यासाठी मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक असावेत.

सर्वात महत्वाचे सध्या सोलापूर, सातारा पुणे जिल्ह्यात वेगाने विकास होत आहे. परिणामी पालखी मुक्कामासाठी भविष्यात जागा अपुरी पडू नये यासाठी गेली काही वर्षे आळंदी देवस्थान तळासाठी आणि विसाव्यासाठी कायमस्वरूपी जागेसाठी आग्रही आहे.

याचा विचार करून प्रशासन पालखी तळासाठी जागेचे भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करत आहेत. हे काम तातडीने मार्गी लागले तर वारक-यांना पुढील काळात चांगल्या सोई उपलब्ध केल्या जातील.

आषाढी वारीसाठी आळंदी देवस्थानची मागणी व सूचना

१) पालखी मार्गावरिल उड्डाणपूलाच्या अपु-या कामाच्या ठिकाणी सेवा रस्ता त्वरित करावा.

२) पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणांबरोबरच रिंगण सोहळ्याचे दिशादर्शनक फलक मोटे असावेत.

३) पाण्याची उत्तम व्यवस्था असावी.

४) पालखी तळाबरोबरच दुपारच्या विसाव्यासाठीही मुबलक जागा आरक्षित असावी.

५) महामार्गाच्या कामामुळे मोठाले वृक्ष तोडल्याने सावलीसाठी पालखी मार्गावर तात्पुरते कापडी मंडप असावेत.

६) पालखी मार्गावर वृक्षरोपणाची गरज.

७) मुक्कामाच्या जागांचे आरक्षण तातडीने मार्गी लावावेत.

वारीमधे लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. पालखी तळ अपुरे वाटू लागले. अनेक ठिकाणी पालखी तळासाठी आरक्षण सुरू आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बरड मुक्कामाच्या ठिकाणी सामाजिक सलोखा दिसून आला.

याठिकाणी पालखी तळालगत मुस्लिम दफनभूमी आहे. खाजगी मालकीची जागा असतानाही तेथील काही जागा तळावरिल मुक्कामासाठी मोकळी करून दिली. तर महामार्गासाठीही या समाजाची जागा देण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येने वारीत सुविधा निर्माण करून देण्यासाठी खारीच्या वाटा उचलून सामाजिक सलोखा जपण्याचे काम बरड मुक्कामी दिसून आल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT