आळंदी (ता. खेड) - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पूल बांधताना नदीपात्रात पडलेला राडारोडा. 
पुणे

आळंदीतील नदीत पुलाच्या बांधकामाचा राडारोडा पडल्याने विद्रूपीकरण

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आळंदीत इंद्रायणी नदीवर वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आला. मात्र, पुलाच्या बांधकामाचा राडारोडा ठेकेदाराने तसाच सोडल्याने नदीपात्राचे विद्रूपीकरण झाले आहे. मात्र, संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. 

वाहतुकीस विविध ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून आळंदी शहरात इंद्रायणी नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून पूल बांधले. या पुलाच्या कामाचे बिलही संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात ठेकेदाराने नदीपात्रातील राडारोडा अद्याप उचललेला नाही.

साधकाश्रमासमोरील पूल आणि भक्त पुंडलिक मंदिरालगतच्या पुलाजवळ स्काय वॉकचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी ठेकेदाराने नदीपात्रातच राडारोडा टाकल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा होत आहे. यामुळे नदीचे विद्रुपीकरणही झाले आहे. या कामाचे ठेके जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले आहेत. काम झाल्यानंतर राडारोडा उचलण्याची जबाबदारी असतानाही ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

प्रशासनही याबाबत गप्प असून नदीपात्राच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच इंद्रायणीची अवस्था बिकट झाल्याची भावना भाविकांची आहे.

नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले, की ‘‘याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तीर्थक्षेत्राबाबत झालेल्या बैठकीत अनेकदा मुद्दा मांडला. मात्र दुर्लक्ष केले. यामुळे तीर्थक्षेत्र विकासातून लाभ किती झाला, यापेक्षा त्रास किती झाला, हेच पाहावे लागेल.’’ इंद्रायणीतील राडारोडा प्रशासनाने ठेकेदाराकडून लवकरात लवकर न उचलल्यास भाविक तसेच स्थानिक नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा गिलबिले यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Coastal Flood Risk : कोकण किनारपट्टीला मोठा धोका! यंदा पावसाळ्यात 23 दिवस समुद्राला 'उधाण'; 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

Pune News: म्हाळुंगे परिसरात सकाळी दोन तासांचा वाहन कोंडीचा ट्राफिक अडथळा; राधा चौक ते शितळादेवीनगर, वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू

Solapur NCP Politics: साेलापूरमध्ये राष्ट्रवादीत ‘चलती’ कोणाची? अभिजित पाटील की संजयमामा, मेमध्ये मोठ्या घडामोडींचे संकेत!

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT