पुणे

कार्तिकी वारीच्या नियोजनासाठी तीन नोव्हेंबरला आढावा बैठक

CD

आळंदी, ता. २५ : एक डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्तच्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या नियोजनाची आढावा बैठक पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे.
याबाबतचे पत्र जिल्हा परिषद अधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन शाखेचे सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र घोलप यांनी काढले आहे. संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीनिमित्त एक डिसेंबरपासून कार्तिकी वारी सोहळा आळंदीत सुरू होत आहे. राज्यभरातून लाखो भाविक आळंदीमध्ये दिंड्यांसह येतात. या भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, इंद्रायणी नदीत स्नानासाठी सोय, अखंड वीज पुरवठा, रस्ते दुरुस्ती याबरोबरच आरोग्य सुविधा आणि सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्यासाठी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीसाठी पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा आरोग्य विभाग उपसंचालक, खेडचे उपविभागीय अधिकारी, आळंदी देवस्थानचे विश्वस्त, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याबरोबरच राज्य परिवहन मंडळ, पीएमपीएमएल, पाणीपुरवठा विभाग, महावितरण, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी बैठकीसाठी बोलावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT