पुणे

वारकरी विद्यार्थ्याचे आळंदीतून अपहरण

CD

आळंदी, ता. २० : वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचे शुक्रवारी(ता. १३) फूस लावून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना आळंदीत (ता. खेड) येथे घडली. विठ्ठल नामदेव पेंढारकर (वय १४, रा. ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, घुंडरे गल्ली, आळंदी), असे अपहृत बालकाचे नाव आहे.
याबाबत संस्थाचालक पांडुरंग रामदास जाधव (रा. घुंडरे गल्ली- आळंदी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १९) फिर्याद दिली. त्यानुसार पांडुरंग जाधव यांच्या आळंदी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी विद्यार्थ्यांना सांप्रदायिक शिक्षण दिले जाते. अपहृत विठ्ठल पेंढारकर हा चौदा वर्षीय विद्यार्थी त्यांच्याकडे निवासी राहायला आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेले. तो रंगाने सावळा, अंगाने सडपातळ आहे. त्याचे नाक सरळ आहे. त्याची उंची चार फूट आहे. केस बारीक आणि डोक्यावर शेंडी व गोल चेहरा आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तो मराठी व हिंदी भाषा बोलतो. त्याने काळी पॅन्ट पिवळा टी- शर्ट परिधान केलेला आहे.
दरम्यान, मागील सहा दिवसांत वारकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाची ही दुसरी घटना आहे. अपहरण झाले की पळून गेला की बेपत्ता, याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. वारकरी विद्यार्थ्यांबरोबरच १४ ते १८ वयोगटातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढले आहे. आळंदीसह केळगाव, चिंबळी, मरकळ, चऱ्होली हे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali: ''आपण हास्यजत्रेच्या निवेदिका आहात, परंतु...'', मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या प्राजक्ता माळीला ठाकरे गटाचा टोमणा

Success Story: हवेली तालुक्यातील हर्षद शिंदेंचे एव्हिएशन क्षेत्रात यश; अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश, देशातील केवळ ११ यशस्वी उमेदवारांमध्ये निवड!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Summer Roof Cooling Tips: बाहेर कमी घरातच उन्हाचे चटके बसतायत? मग छताची उष्णता कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' स्मार्ट जुगाड

New Scam : मोबाईल वापरताना छोटीशी चूक! अकाऊंट मधले पैसे हळूहळू होतील गायब; पटकन बदलून घ्या एक सेटिंग अन् डायल करा 'हा' नंबर

SCROLL FOR NEXT