आळंदी, ता. १६ : आळंदी नगरपरिषद हद्दीतील पुणे-आळंदी प्रमुख वाहतुकीच्या मार्गावरील देहूफाटा चौकात नगरपरिषदेने जलवाहिनी व ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता खोदाई केली. मात्र, काम पूर्ण झाल्यावर चार दिवस उलटूनही येथे अद्याप डांबरीकरण केले नाही. त्यामुळे वाहनचालकांना खडी वरून वाहन चालवताना कसरत करावी लागत असल्याने येथे अपघाताची शक्यता आहे.
रस्त्यावर खडी अस्ताव्यस्त पसरल्यामुळे माती आणि छोटे-मोठे दगड उडून वाहन चालकांना याचा मार बसत आहे. मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिक करत आहेत.
रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
निविदा प्रक्रिया तातडीने करणे गरजेचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत पुणे-आळंदी रस्त्यासाठी आळंदी नगरपरिषद हद्दीत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक महिने झाले. मात्र, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच इंद्रायणी पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. आता आषाढी वारी जवळ आले असल्याने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करून संपूर्ण पुणे-आळंदी रस्त्याचे आळंदी नगरपरिषद हद्दीत डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
एक कोटी निधीच्या खर्चाबाबत नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली आहे. रस्ता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया लवकरात लवकर करून रस्ता केला जाईल.
-प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष
आळंदी शहरात वाहतूक कोंडी दररोज असते. त्यात डंपर, ट्रक आणि पीएमपीएल बस दुचाकी वाहनचालकांची पर्वा करत नाहीत. नगरपरिषदेने खोदलेल्या रस्त्यावर खडी पसरल्याने वाहने घसरून अपघात घडण्याची शक्यता आहे.
-उदय पवार, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.