पुणे

आळंदीत दोन रिक्षाचालकांवर गुन्हा

CD

आळंदी : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोन रिक्षाचालकांवर गुरुवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला. नगर परिषद चौकातील अरुंद पुलावर ही कारवाई करण्यात आली.
चंद्रकांत शंकर भोसले (वय ५२, रा. भाजी मंडई, आळंदी) आणि संदीप नानासाहेब बोर्डे (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या चालकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास भोसले यांनी आपली रिक्षा (एमएच १४, केयू ८३४१) आणि बोर्डे यांनी (एमएच १४, एमएस १७९८) आळंदी नगर परिषद चौकातील अरुंद पुलावर उभ्या केल्या होत्या. यामुळे पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धोका व इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिस शिपाई उमेश सुरवसे आणि पोलिस हवालदार कीर्ती कल्लूरकर यांनी फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला! दर नियंत्रणासाठी सरकारने उचलली कठोर पावलं; इथेनॉलमुळे खरंच भाव वाढले?

नवे-जुने मराठी चित्रपट आणि वेबसीरिज एकाच OTTवर; ‘८ वाजून १३ मिनिटे’ ते ‘कैरी’पर्यंत पाहा काय खास

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या "छात्रों की गुंज" ला "संपूर्ण वंदे मातरम्" गायनाचे मिळणार उत्तर?

कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

SCROLL FOR NEXT