पुणे

जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी आळंदीकरांची बैठक

CD

आळंदी, ता. २४ : आळंदी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन जागेतील जळणारा कचरा आणि त्यावरील उपाय योजनाबाबत तसेच शहरातील अन्य विकास प्रक्रियेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची शुक्रवारी (ता. २७) बैठक बोलवली असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली.
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यालयात मंगळवारी (ता. २४) प्रत्यक्ष भेट घेऊन बैठकीची वेळ घेण्यात आली आहे. आळंदी देवस्थाने पाच एकर गायरान आळंदी नगरपरिषदेला कचरा डेपोसाठी दिले होते; मात्र सध्या शहराचे वाढते नागरीकरण पाहता कचरा व्यवस्थापनासाठी जागा कमी पडत आहे.तसेच आळंदी शहराचे क्षेत्रफळ ही कमी असल्याने अन्य ठिकाणी कचरा व्यवस्थापन करू शकत नाही. यामुळे आळंदी देवस्थानकडे जादाच्या जागेची मागणी केली जात आहे. तर घनकचरा ज्या जागेमध्ये व्यवस्थापन केला जात आहे त्या ठिकाणी रस्ता पाणी तसेच वीज व्यवस्था सीसीटीव्ही व्यवस्था करणे बाबत जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये बैठक आयोजित केले आहे. या बैठकीसाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, प्रशासन अधिकारी असतील. याचबरोबर लगतच्या ग्रामपंचायत यांचा ही कचरा आळंदी घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेत टाकला जात होता, तो सध्या बंद केला आहे. तर काही खासगी व्यावसायिक हॉटेल व्यवसाय रात्रीच्या वेळी आळंदी शहरात रस्त्यांवर तसेच कचरा डेपोच्या जागेमध्ये कचरा आणून टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर प्रतिबंध करण्या बाबतची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे. याचबरोबर नफा न तोटा या तत्त्वावर काम करणाऱ्या सार्वजनिक संस्थांसोबतही घनकचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा करून त्यावर मार्ग काढला जाणार आहे. तर एसटीपी प्रकल्प आणि शहर अंतर्गत पार्किंग व्यवस्था तीर्थक्षेत्र विकास आराखडा यातून करण्यात येणाऱ्या कामाबाबतही गाऱ्हाणे मांडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT