Sant dnyaneshwar and sant tukaram chal paduka in london sakal
पुणे

Alandi News : आळंदी विश्व भ्रमण दिंडीचे लंडनमध्ये उत्साहात स्वागत

यंदाचे वर्ष आळंदी संस्थानने संत ज्ञानेश्वर माऊलींचे सप्त शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव साजरा करत आहे.

विलास काटे

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव निमित्त आळंदीतील विश्वशांती जगतगूरुसेवा संस्था संचलीत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकात्मक चल पादूका विश्व भ्रमण यात्रेच्या माध्यमातून लंडन येथे पोचल्या. त्या ठिकाणी शनिवारी (ता. २१) रविवारी (ता. २२) संत पादूका दर्शनाचा लाभ भारतातून लंडनमधे स्थायिक झालेल्या भाविकांनी मनोभावे घेतला.

याबाबत माहिती देताना विश्वशांती जगतगूरुसेवा संस्थेचे अध्यक्ष दादा कारंडे यांनी सांगितले, यंदाचे वर्ष आळंदी संस्थानने संत ज्ञानेश्वर माऊलींचे सप्त शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव साजरा करत आहे. संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी पसायदान रुपी वैश्विक प्रार्थना लिहीली. तर संत साहित्य, शांती एकता आणि बंधुता चा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने पादूका दर्शन कार्यक्रम आयोजित केला.

भारतातून बाहेरच्या देशात स्थायिक झालेल्यांना संत दर्शनाचा लाभ व्हावा आणि संतचरित्राची गोडी लागवी हाच एकमेव उद्देश आहे. आम्ही बुधवारी(ता.१८) श्रीक्षेत्र आळंदी मधे संत ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी दर्शन आणि पादूका पूजन केले.त्यानंतर टाळमृदंगाच्या साथीत दिंडी काढून नगरप्रदक्षिणा केली. यावेळी शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांनी आशिर्वाद दिले.

दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी राम गावडे, डि. डि. भोसले, विठ्ठल शिंदे, डॉ. जनार्दन वाघमारे, जनार्दन पितळे, प्रकाश पानसरे, शिरिष कारेकर, अरुण बडगूजर, तुकाराम माने, अमोल विरकर यांची उपस्थीती होती. यानंतर संतांच्या प्रतिकात्मक चल पादूका आळंदी देहूमार्गे मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळ असा प्रवास करत लंडनमधे पोचल्या. लंडन येथे हिथ्रो विमान तळावर स्लॉव्ग मित्र मंडळ यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मंदार मिराशी, आनंद पंडित, सागर खिंडारे, सागर कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

लंडनमधे शनिवार रविवार दोन दिवस पादुकांना विधिवत पूजन, लंडनच्या भाविकाकडून अभिषेक, पादूका दर्शन, महाप्रसाद आणि भजन असा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT