पुणे

पुणे-आळंदी मार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त

CD

आळंदी, ता. २० : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषदेने बुधवारी (ता. २०) पुणे-आळंदी मार्गावरील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबवली. देहू फाटा ते काळे कॉलनी दरम्यानच्या टपऱ्या, शेड आणि अनधिकृत भिंती यावेळी जमीनदोस्त करण्यात आल्या.
आषाढी वारी सोहळा दोन महिन्यांवर आल्याने भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत बॅनर, होर्डिंग व पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली. शहरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि अतिक्रमण करू नये, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. कारवाईवेळी दिघी पोलिस ठाण्याचे कर्मचारी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, रचना सहाय्यक प्रतीक काळे तसेच नगर परिषदेचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Pune News : पुण्यात आठ मतदारसंघांत मोठ्या फेरबदलाची शक्यता! तब्बल १४ लाख मतदार वगळणार

Marathi News Live Updates : जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती; ४० जण रुग्णालयात दाखल

Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

SCROLL FOR NEXT