alephata bus stand theft case gang arrested worth rs 9 lakh seize pune crime police Sakal
पुणे

Pune Crime : बस स्थानकावर चोरी करणारी टोळी जेरबंद; ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एस.टी‌.स्टॅड वर प्रवाशांचे दागिने चोरणा-या वेगवेगळ्या टोळींकडुन १८ गुन्हे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

- राजेश कणसे

आळेफाटा : आळेफाटा पोलिसांनी बस स्थानकावर चोरी करणारी टोळीस जेरबंद करून ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२७ डिंसेंबर रोजी विजय मंजाभाऊ औटी हे आळेफाटा या ठिकाणाहुन मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी अहमदनगर - कल्याण एस.टी.मध्ये चढत असताना,

कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्यानंतर या बाबतची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे चोर चाकी गाडी घेऊन चोरी करत असल्याचे निर्देशनास आल्यानंतर पोलिसांचे पथक बिड येथील पाडळशिंगी या ठिकाणी जाऊन

१) रामेश्वर अंबादास जाधव रा.शिरापुर या.शिरूर कासार, २)विकास शिवाजी गायकवाड रा.दहिटना बु.ता.घनसांगवी जि.जालना, ३)आकाश अशोक जाधव रा.सलगरा बु.लातुर, ४) दिपक ज्ञानेश्वर जाधव रा.शिरापुर धुमाळ ता.शिरूर कासार,

५) सागर संपतराव झेंडे रा.अंबिका चौक बाब, ६) जालिंदर वामन डोकडे रा.शिरूर कासार, ७ )अरिफ रेहमान शेख रा.मोमिन पुरा बिड या सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी आळेफाटा पोलीस हद्दीत ४ गुन्ह्यामध्ये साडे सात तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुल केले.

चोरलेले सोने आकाश बेंद्रे रा.बिड यास विकल्याचे सांगीतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली बोलेरो वाहन एम.एच.४४ बी.७१३७ असा ऐकुन ८ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपींस अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर ,

सहा.फौजदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड ,नरेंद्र गायकवाड,भिमा लोंढे,संजय शिंगाडे,दुपारगुडे ,पारखे,अमित माळुंजे ,नविन अरगडे,हनुमंत ढोबळे ,केशव कोरडे पोलीस मित्र सचिन पानसरे,रामराजे मुळीक यांनी केली.

दरम्यान आळेफाटा पोलिसांनी आतापर्यंत एस.टी‌.स्टॅड वर प्रवाशांचे दागिने चोरणा-या वेगवेगळ्या टोळींकडुन १८ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांच्याकडुन जवळपास ५३ तोळे सोने व १५ तोळे चांदीचे दागीने जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT