आळेफाटा, ता. १९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपास येथील हायमास्ट पथदिवे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
आळेफाटा बायपास मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील वळणे, स्पीडब्रेकर आणि रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण जात आहे. विशेषतः अंधारात स्पीडब्रेकर दिसत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरात व्यापारी आणि स्थानिक नागरिकांची सतत वर्दळ असते, मात्र पथदिव्यांअभावी भीतीचे वातावरण आहे.
‘टोल भरूनही जीव मुठीत घेऊन प्रवास’
वडगाव आनंदचे माजी उपसरपंच ऋषिकेश गाडगे म्हणाले, ‘‘आळेफाटा बायपास परिसरात मोठी वाहतूक असते. वाहनचालक टोलनाक्यावर पैसे भरूनही पुढे जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पथदिवे बंद असल्याने रस्ता क्रॉसिंग आणि स्पीडब्रेकरचा अंदाज येत नाही. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हे पथदिवे सुरू करावेत.’’
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.