पुणे

फुटबॉल

CD

PNE26W17660
अहिल्यानगर ः ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत बचाव करताना खेळाडू.
---------
PNE26W17659
स्पर्धेतील एका सामन्यात हेरड किक मारताना खेळाडू.

गुलमोहर, शिवाजीयन्सची आगेकूच
ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धा ः रंगतदार सामन्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. ८ ः शहरातील भुईकोट किल्ला मैदानावर सुरू ॲलेक्स कपच्या फुटबॉल स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रंगणाऱ्या चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेचा थरार अधिकच वाढत आहे. दोन सामन्यांत गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड संघांनी शानदार विजय मिळविला, या संघांनी पुढील फेरीत प्रवेशाकडे वाटचाल केली.
स्पर्धेतील गुलमोहर स्पोर्टस क्लब विरुद्ध बाटा फुटबॉल क्लब सामना विशेष लक्षवेधी ठरला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केले. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला बाटा फुटबॉल क्लबच्या कामरान रंगरेजने शानदार गोल करत संघाचे खाते उघडले, संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर बाटा एफसीचा आत्मविश्‍वास उंचावला होता.
मात्र, पिछाडीवर पडल्यानंतर गुलमोहर स्पोर्टसने आक्रमक आणि संयमी खेळ करत पुनरागमन केले. संघाच्या प्रणव पंडितने १७ व्या मिनिटाला अचूक गोल केला, सामना १-१ ने बरोबरीत आणला. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला आदित्य गुगळेने अप्रतिम गोल करत गुलमोहर एससीला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखण्यात संघाला यश आले. गुलमोहर स्पोर्टसने शानदार विजयाची नोंद केली.
दुसऱ्या सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि फ्रेंडस मातोश्री फुटबॉल क्लब यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या. सामन्याच्या २६ व्या मिनिटाला भानुदास चंदने गोल करत फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. त्यानंतर फ्रेंडस मातोश्री एफसी संघाने बरोबरी साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
----------
फुटबॉल संस्कृतीला चालना
स्पर्धेतील वेगवान खेळ, उत्कृष्ट पासिंग, बचावातील शिस्त आणि आक्रमणातील धार यामुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ॲलेक्स कप स्पर्धेमुळे शहरातील फुटबॉल संस्कृतीला चालना मिळत असून, युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT