आळगे गांजा प्रकरणातील आणखी दोघांना अटक
२११ किलो गांजा जप्त; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. १४ : आळगे (ता. अक्कलकोट) येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी फरार असलेल्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. सिद्धाराम मल्लप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ३९) आणि श्रीकांत मल्लप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ३०, दोघेही रा. शेगाव, ता. अक्कलकोट) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी यापूर्वी मलप्पा गुरबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव) याला अटक केली होती. कारवाईत २११ किलो ९०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ७५ हजार रुपये आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे आळगे येथे कारवाई करण्यात आली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि अंमली पदार्थांबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, अविनाश पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे, अमोल माने, मिलिंद मिठ्ठापल्ली आदी उपस्थित होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न
निधीअभावी बंद असलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर ही यंत्रणा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती अतुल कुलकर्णी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.