khadakwasla dam
khadakwasla dam 
पुणे

पुण्यातील धरणे 22 वर्षांनी प्रथमच जुलै अखेरीस भरली

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : 22 वर्षांनी भीमा-कृष्णा खोऱ्यातील धरणे जुलैचा शेवटचा, तर ऑगस्टचा पहिला आठवड्याच्या दरम्यान भरली. यापूर्वी 1997 मध्ये अशा पद्धतीने धरणे भरल्यानंतर मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. भीमा उपखोऱ्यातील 27 धरणांमध्ये आज एकूण 94.56 टक्के, तर कृष्णा उपखोऱ्यातील 12 धरणांमध्ये 94.08 टक्के भरली.

भीमा उपखोऱ्यामध्ये मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील धरणांचा समावेश होतो. या धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 218.4 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, आज सकाळपर्यंत या धरणांमध्ये 206.5 टीएमसी (94.56 टक्के) साठा झाला आहे. उजनी, खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे, चासकमान, आंद्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. पवना मुळशी, नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, कुकडी खोऱ्यातील घोड, डिंभे ही मोठी धरणे 95 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरल्याने, त्या धरणांतून विसर्ग सुरू आहे.

कृष्णा उपखोऱ्यांतील सर्व धरणे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरली आहेत. येथील बारा धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 209.88 टीएमसी असून, त्यामध्ये 197.4 टीएमसी (93.85 टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे, सर्व धरणांतून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे म्हणाले, ""दरवर्षी सर्वसाधारणपणे 15 ऑगस्टनंतर धरणे भरण्यास प्रारंभ होतो. सप्टेंबरमध्ये सर्व धरणे भरतात. यंदा जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच सर्व मोठी धरणे भरली. त्यामुळे, सर्व धरणांतून विसर्ग सुरू ठेवला. पूरनियंत्रणासाठी सर्व धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशी स्थिती 22 वर्षांपूर्वी आली होती.''

भीमा उपखोऱ्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षी आठ ऑगस्टला एकूण 153 टीएमसी (70 टक्के), तर कृष्णा उपखोऱ्यांतील सर्व धरणांमध्ये 187.6 टीएमसी (89 टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT