Rajesh-Tope 
पुणे

आरोग्य खात्याकडून पुण्यासाठी सर्व सुविधा - राजेश टोपे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पुण्यात ‘कोरोना’चे पाच रुग्ण सापडल्याची बाब राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. या रुग्णांसह संशयितांवर तातडीचे उपचार करण्यासाठी शहरात सर्व प्रकारच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. रुग्ण आणि संशयितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी खाटांची संख्या आणि तज्ज्ञ डॉक्‍टर पुरविण्याचे नियोजन राज्याच्या आरोग्य खात्याने केले आहे.

कोरोनाचे रुग्ण, त्यांच्यावरील उपचार, त्यांची प्रकृती आणि उपलब्ध यंत्रणेवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेला सर्वतोपरी मदत करीत आहोत, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यांतील लोकांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा वावर आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने विविध ठिकाणी सुमारे तीनशे खाटांची सोय करून संशयितांना दाखल करून घेण्याची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर टोपे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

पुण्यात सध्या आरोग्य खाते आणि महापालिकेच्या सुविधा आहेत. त्याशिवाय गरजेचे कमीत-कमी वेळांत अन्य यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. त्याची पूर्वतयारी केली आहे. रुग्णांना लगेचच दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, लोकांनी उगाचच भीती बाळगू नये.
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT