Zika Virus esakal
पुणे

Zika Virus : पुणे शहरात झिकाचे सर्व रुग्ण बरे; दोन दिवसात नवे रुग्ण नाही

पुणे शहरात गेल्या काही आठवड्यापासून झिकाचे रुग्ण आढळत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून एकाही रुग्ण आढळलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात गेल्या काही आठवड्यापासून झिकाचे रुग्ण आढळत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून एकाही रुग्ण आढळलेला नाही. तसेच २६ गरोदर महिलांसह ६६ जणांना झिकाची लागण झाली होती. ते सर्वजण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहरात २० जून रोजी पहिला झिकाचा रुग्ण आढळून आलेला होती. त्यानंतर एरंडवणे, मुंढवा भागातही रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी, संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. २० जून ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शहरात एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली.

गर्भवती महिलांना झिकाचे धोका असल्याने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली जात होती. आत्तापर्यंत २६ गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली. त्यापैकी २३ महिलांची १६ जास्त आठवड्याची गर्भधारणा असल्याने त्यांची ॲनोमॅली स्कॅन करण्यात आले. त्यात काहीही गंभीर आढळून आलेले नाही.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शहरात एक रुग्ण आढळून आलेला नाही. जे रुग्ण आढळले होते, ते सर्वजण बरे झाले असल्याचे आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT