Aman Kirloskar statement Students should create awareness about water conservation pune sakal
पुणे

Pune News : विद्यार्थ्यांनी पाणी बचतीविषयी जागृती करावी; अमन किर्लोस्कर

अमन किर्लोस्कर; डॉ. दादा गुजर विद्यालयात जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

अशोक बालगुडे

उंड्री : मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहावे, पिण्यासाठीचे स्वच्छ पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, पाणी बचतीविषयी विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जागृती केली पाहिजे, असे मत किर्लोस्कर कंपनीचे अमन किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.

डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयामध्ये 10 हजार लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अमन किर्लोस्कर, हरेंद्र गोडांबे, जगदीश पुरंदरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अरुण गुजर, अनिल गुजर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष योगेश घुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे बाळासाहेब घुले, डॉ. सुरेश मिजार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी गोरे यांनी केले. सीमा बेल्हेकर यांनी आभार मानले. डॉ. सुरेश मिजार म्हणाले की, अशुद्ध पाण्यामुळे उलट्या, जुलाब, काविळसारखे आजार होतात. पिण्याच्या पाण्याच्या टाकी परिसरात खरकटे टाकू नका, स्वच्छता राखा आणि इतरांनाही तसा संदेश द्या, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT