पुणे

आंबेगावातील दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

CD

मंचर, ता. ११ : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (ता. ११) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. पुणे-नाशिक महामार्गावर मोरडेवाडीजवळ इको मोटार सुमारे २० फूट खाली कोसळली, तर नारायणगाव-जाधववाडी मार्गावर मोटारसायकलला मोटारीने धडक दिल्याने या दुर्घटना घडल्या.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोरडेवाडी येथे घडली. आनंदराव शंकर कोळेकर (वय ५३, रा. करंजविहिरे, ता. खेड) व किरण बाबूराव डुंबरे (वय ३५, रा. दावडी, ता. खेड) हे इको मोटारीतून (एमएच १४ एचडब्ल्यू ४३२७) आळेफाटा येथे निघाले होते. मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडून खाली कोसळली. या अपघातात मोटारीचा चक्काचूर होऊन गंभीर दुखापतींमुळे कोळेकर व डुंबरे यांचा जागीच मृत्यू झाला. विजय तांबडे आणि संतोष ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य केले.
दुसरी घटना नारायणगाव-जाधववाडी अष्टविनायक महामार्गावर घडली. जाधववाडी येथील रहिवासी रमेश भाऊ जाधव (वय ५६) व तुषार सुरेश जाधव (वय ३१) हे नारायणगाव येथे गवार विकून मोटारसायकलवरून घरी परतत होते. त्यावेळी मागून आलेल्या एका स्विफ्ट मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात रमेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी उपसरपंच संपत जाधव व कैलास जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. दोन्ही घटनास्थळी मंचरचे पोलिस हवालदार लक्ष्मण उंडे व पोलिस रमेश उगले यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

MAC26B16557, MAC26B16558, MAC26B16559, MAC26B16561

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT