पुणे

एक तरी पोर, शाळेत येऊ दे...

CD

अविनाश घोलप
फुलवडे, ता. १०: शाळेची घंटा वाजण्याआधीच, आंब्याच्या मोहराचा सुगंध आणि रानाच्या शांततेत शिक्षकांचे पाय मात्र दुर्गम वाड्या-वस्त्यांकडे वळत आहेत. हातात खडू-फळा नव्हे, तर शाळेची माहितीपत्रके आणि मनात एकच ध्यास... ''विद्यार्थी द्या, शाळा वाचवा!'' आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील शाळांमधील रिकामे होत असलेले वर्ग आणि घटणारी पटसंख्या, हे या शिक्षकांच्या धावपळीमागील वास्तव आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थी संख्या दहाच्या खाली आल्याने, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी शिक्षकच आता ''मिशन ॲडमिशन''वर निघाले आहेत.
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा आदिवासी आणि दुर्गम म्हणून ओळखला जातो. या भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांचे जाळे विणले गेले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तालुक्याच्या नऊ केंद्रांमधील आकडेवारी पाहिली असता, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि संचमान्यतेच्या नियमांनुसार, विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. पटसंख्या कमी झाल्यास शिक्षक अतिरिक्त ठरतात आणि त्यांची दुसऱ्या शाळेत बदली केली जाते. यामुळे केवळ शिक्षकांच्या नोकरीवरच गदा येत नाही, तर गावातील शाळा बंद पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. याच भीतीपोटी शिक्षक आता स्वतःच रस्त्यावर उतरले आहेत.

शिक्षणाशिवाय पर्याय नाही
तुमच्या मुलाला शाळेत पाठवा, त्याला चांगल्या सुविधा मिळतील," असे कळकळीचे आवाहन करत शिक्षक गावागावांत आणि वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. शाळेतील भौतिक सुविधा, मोफत गणवेश, पुस्तके, पोषण आहार आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती ते पालकांना देत आहेत. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ते पालकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दृष्टिक्षेपात :
आंबेगावच्या आदिवासी भागातील केंद्रे : ९ (तिरपाड, कुशीरे, बोरघर, असाणे, राजपूर, पोखरी, गोहे बुद्रुक, डिंभे वसाहत, गंगापूर)
जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या : ८७,
१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा -: ४०
हायस्कूल : १२ (तिरपाड, असाणे, माळीण, बोरघर, फुलवडे, गोहे, पोखरी, जांभोरी, तळेघर, डिंभे, शिनोली, गंगापूर)
शासकीय आदिवासी आश्रमशाळा : ५ (आहुपे, असाणे, गोहे, राजपूर, तेरुंगण)
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा : १ (फुलवडे)

संचमान्यतेमध्ये पटसंख्या कमी झाल्यानंतर शिक्षक अतिरिक्त होतात. म्हणून स्वतः शिक्षक गावांमध्ये जाऊन पालकांमध्ये जनजागृती करत आहेत. जेणेकरून शाळेचा पटही चांगला राहील आणि शिक्षकही अतिरिक्त ठरणार नाही.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रवेशवृद्धी करण्यासाठी ता. १ ते ६ मे दरम्यान विशेष अभियान अंतर्गत परिसरातील आदिवासी वाड्यावस्त्यांवर जाऊन पालकांशी संवाद साधला असून निश्चितच विद्यार्थी संख्येत वाढ होईल.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प कार्यालय घोडेगाव

केवळ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून प्रश्न सुटणार नाही, तर सरकारने शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे.
- पुनाजी पारधी, अध्यक्ष ग्रामविकास फाउंडेशन जांभोरी, ता. आंबेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय यांच्या शपथविधीला आर्मी ड्रेसमध्ये CSKचा खेळाडू? अश्विनने घेतली फिरकी, संघानेही शेअर केला व्हिडीओ

Akshada Pawase Success Story: पेपर विक्रेत्याच्या मुलीची भरारी! अक्षदा दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रतिकूल परिस्थितीवर मात..

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात अव्यवस्थेचा कळस; प्रयोग रद्द करण्याची नामुष्की, ध्वनीव्यवस्थेत बिघाड अन् वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त..

Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

SCROLL FOR NEXT