Ambegaon Garbage Depot Fire 
पुणे

आंबेगाव कचरा डेपोला आग लागली की लावली? वाचा सविस्तर

पांडुरंग सरोदे

पुणे : आंबेगाव येथील कचरा डेपो प्रकल्पाला स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संबंधित व्यक्तींनी कचरा डेपोला आग लावण्याबरोबरच तेथील कार्यालयाचीही तोडफोड केली. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेनंतर अग्निशामक दलाच्या पाच बंबांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांकडून आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्राला रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता आंबेगाव येथील कचरा डेपोला आग लागल्याची खबर मिळाली. त्यानंतर सिंहगड अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उमराटकर त्यांच्या जवानांसह काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या मदतीला कात्रज अग्निशामक केंद्राचे संजय रामटेके व कोंढवा अग्निशामक केंद्राचे अधिकारी समीर शेख त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोचले.

तीन अधिकारी व पंधरा जवानांकडून आग विझविण्यास सुरवात झाली. परंतु कचरा, प्लॅस्टिकमुळे आग वाढत होती. त्यावर अग्निशामक दलाच्या तीन बंबानी पाण्याचा मारा केला. त्यानंतर एक ते दोन तासांनी आगीवर नियंत्रण आले. तरीही धूर मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्र मागविला. त्याच्या मदतीने आग विझविण्यात येऊ लागली. 

काही स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनीच कचरा डेपोला आग लावली, त्याचबरोबर कचरा डेपोच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप नागरिकांनी केला. या तोडफोडीमध्ये कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्‍या व फर्निचरचे नुकसान झाले. या घटनेनंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT