ambegaon gram panchayat election update kitli symbol dispute politics esakal
पुणे

Pune : हॉटेल व्यावसायिकाला किटली निवडणुक चिन्हामुळे किटलीतील चहा वर आक्षेप आल्याने थर्मास मध्ये चहा आणावा लागला

आक्षेप घेतल्याने हॉटेल व्यवसायिकाला कीटलीतील चहा परत नेऊन थर्मास मध्ये चहा ओतून आणावा लागला

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किटली चिन्हामुळे मतदान केंद्रात निवडणूक कर्मचाऱ्यांना किटलीत चहा घेऊन आलेल्या चहावाल्याला विरोधी उमेदवाराने चहाच्या किटलीवर आक्षेप घेतल्याने किटलीतील चहा परत नेऊन थर्मास मध्ये चहा आणण्याची वेळ आल्याचा गमतीदार प्रसंग एका गावात घडला आहे.

आज तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह असल्याने या चिन्हावरून गमतीदार प्रसंग घडत आहे. कपबशी हे दैनदिन जीवनात दररोज वापरात येणारी वस्तू असल्याने उमेदवारांची सर्वात जास्त पसंती कपबशीला असते. एका गावात कपबशी चिन्ह असणाऱ्या उमेदवाराने मतदारांना कपबशी वाटल्याची चर्चा आहे तर किटली चिन्ह वाल्या उमेदवाराने किटली वाटल्याचे समजते , केक चे चिन्ह असणाऱ्याने केक व नारळ चिन्ह असल्याने नारळ वाटल्याची माहिती समजली आहे.

एका गावात एका उमेदवाराचा वीट बनवण्याचा कारखाना आहे त्याने वीट चिन्ह , ट्रॅव्हलिंग व्यवसाय असणाऱ्या उमेदवाराने बस चिन्ह तर लाईट व वायरिंग ची कामे करण्याऱ्या उमेदवाराने विजेचा खांब चिन्ह घेतले आहे. गॅस सिलिंडर चा पुरवठा करणाऱ्या उमेदवाराने सिलिंडर चिन्ह घेतले आहे.

आज मतदानाच्या दिवशी एका गावात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना हॉटेल व्यवसायिकाने किटलीमध्ये चहा आणला परंतु योगायोगाने तेथील निवडणुकीत एका उमेदवाराचे चिन्ह किटली असल्याने विरोधी उमेदवाराने चहा किटलीत का ? आणला यावर आक्षेप घेतल्याने हॉटेल व्यवसायिकाला कीटलीतील चहा परत नेऊन थर्मास मध्ये चहा ओतून आणावा लागल्याचा गमतीदार प्रसंग घडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT