ambegaon nagapur farmers three hur caught fire  Sakal
पुणे

Fire Accident News : नागापुरात शेतमजुरांच्या तीन झोपड्या जळून खाक

शेत मजुरांची लहान मुलगी स्वयंपाक करत असताना झोपड्यांना आग लागली.

नवनाथ भेके

निरगुडसर : नागापूर (ता. आंबेगाव ) येथे ठाकर समाजातील तीन शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्या यामध्ये संसारपयोगी साहित्य,रोख रक्कम,धान्य,कपडे, दोन दुचाकी, २ सायकली जळून खाक झाल्याने तीन शेतमजुरांचे अंदाजे ३ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . ही घटना गुरुवार (ता.०२ )रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

नागापूर गावाच्या पश्चिमेला पाण्याच्या टाकी जवळ संपत तबाजी दूधवडे, योगेश भालेकर, शिवाजी गेणभाऊ दुधवडे या ठाकर समाजातील हे शेतमजुर २५ ते ३० वर्षापासून वास्तव्यास आहेत,याठिकाणी शेतमजुरांनी राहण्यासाठी झोपड्या बांधल्या आहेत आहेत.

गुरुवार (ता.०२ ) रोजी सायंकाळी शेत मजुरांची लहान मुलगी स्वयंपाक करत असताना झोपड्यांना आग लागली. त्यावेळी पुरुष मंडळी कामावर गेली होती,त्यामुळे आग विझवायला उशिर लागला .

त्यानंतर स्थानिक तरुणांनी आग विझवली तरी देखील या आगीमध्ये संसारपयोगी साहीत्य, दुचाकी, कपडे, धान्य जळून खाक झाले . संपत दुधवडे यांची एक दुचाकी, सिलेंडर गॅस टाकी, सायकल, रोख पाच हजार रुपये, शिवाजी दुधवडे यांची दुचाकी, रोख ९ हजार रुपये, सायकल, धान्य, कपडे, योगेश भालेकर यांची भुईमूग शेंगा पोते, हरभरा पोते,

असे तीन शेतमजुरांचे अंदाजे ३ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे एका झोपडीत गॅसची टाकी होती,लागलेल्या आगीमुळे टाकीचा स्फोट झाला परंतू सुदैवाने जिवितहानी झाली नाही . शुक्रवार (ता.०३ ) रोजी सकाळी कामगार तलाठी संकेत गवारे, सहाय्यक सारंग भोंडवे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT