पुणे

सुवासिक आंबेमोहोर तांदूळ दुर्मीळ

गोरख माझिरे

कोळवण - आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनाचा खर्च व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी व इतर तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकेकाळी आंबेमोहोर तांदळाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्‍यातच त्याचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. चवीसाठी प्रसिद्ध असलेला हा सुवासिक तांदूळ आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याची जागा इंद्रायणी तांदळाने घेतली आहे. 

आंबेमोहोर तांदळाचा उत्पादन कालावधी साडेतीन महिने असून, उत्पादन खर्चही अधिक आहे. त्या तुलनेत इंद्रायणी, फुले समृद्धी, कोलम या तांदळाचा उत्पादन खर्च आणि उत्पादन कालावधी कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल इतर तांदळाच्या उत्पादनाकडे वाढला आहे. सध्या आंबेमोहोर तांदळाची चवही चाखायला मिळत नाही.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये पंचवीस वर्षांपूर्वी इंद्रायणी जातीचे भाताचे  बियाणे विकसित करण्यात आले. इंद्रायणी जातीची उत्पादकता ही इतर जातीच्या भातापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आणि त्याची चव व वास चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबेमोहोर जातीऐवजी इंद्रायणी भाताला प्राधान्य दिले. इंद्रायणी वाणाचा प्रसार पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या इतर भागात झपाट्याने झाला. इंद्रायणीच्या आगमनामुळे आंबेमोहोर तांदळाची चव चाखायला मिळत नाही. अजूनही बाजारात काही खवय्ये सुवासिक व चवदार आंबेमोहोर तांदळाची मागणी करीत असतात. मात्र, आता तो पिकवणारा मोजकाच शेतकरी शिल्लक राहिला आहे.

प्रचलित पद्धतीनुसार खरीप हंगाम हा जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये असतो. खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने मुळशी तालुक्‍यात एकूण ११ हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यात ८ हजार ६० एकर क्षेत्रांत भाताचे पीक घेतले जाते. यात फक्त सुमारे १०० हेक्‍टरमध्ये शेतकऱ्यांनी आंबेमोहोर ची लागवड केली होती. 
 - के. एम. हसरमनी,  तालुका कृषी अधिकारी, मुळशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT