बावधन - अँबियन्स अँटिलिया सोसायटीने उभारलेला अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प.
बावधन - अँबियन्स अँटिलिया सोसायटीने उभारलेला अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प. 
पुणे

‘अँबियन्स’ सोसायटीचे दहा लाख वाचले

सकाळ वृत्तसेवा

बावधन - येथील अँबियन्स अँटिलिया सोसायटीने सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा नवा आदर्श इतर सोसायट्यांसमोर ठेवला आहे. महिन्याला ५ हजार १०० युनिट वीजनिर्मिती करणारा ४१.३ किलोवॅट क्षमतेचा आधुनिक सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे. यामुळे सोसायटीच्या वीजबिलात वर्षाला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. 

या प्रकल्पाचे उद्‌घाटन सहायक उपनिबंधक दिग्विजय राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक दिलीप वेडे, नगरसेविका अल्पना वरपे, चेअरमन संजय चौधरी, सेक्रेटरी गिरीश काळे, कमिटी सदस्य दीपक हर्डीकर आणि सोसायटी सभासद यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या माध्यमातून सोसायटीच्या वीजबिलात वर्षाला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. प्रकल्पामध्ये व्दिनपीक या कॅनडियन सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्याची क्षमता साधारण १८ टक्के एवढी आहे. या तंत्रज्ञानामुळे जर सोलरवरत धूळ किंवा सावली पडली तरी संपूर्ण प्लेट बंद न पडत उर्वरित प्लेट ऊर्जा निर्मिती करत राहते. या पॅनल ला इंटरनेटशी जोडल्याने दिवसभरात किती वीज निर्माण झाली किंवा आत्तापर्यंत किती निर्माण झाली हे पाहणे शक्‍य होणार आहे.

हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून वर्षभरात जवळपास ५१ टन कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचणार आहे. 

याबाबत हर्डीकर म्हणाले, ‘अशा अत्याधुनिक यंत्रणा वापरून उभारण्यात आलेला हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प आहे. यास एकूण २२ लाख रुपये एवढा खर्च आला असून, सर्व सभासदांनी एकत्र येत ४ महिन्यांत हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचा वर्षाचा देखभाल खर्चदेखील खरेदी किमतीत असल्याने सोसायटीला त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT