Ambiguity about the action on celebrities for doling false advertising 
पुणे

फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई? काय सांगतो ग्राहक संरक्षण कायदा

सनील गाडेकर

पुणे : उत्पादनाची जाहिरात कोणत्या सेलिब्रिटीने केली आहे याचा विक्रीवर परिणाम होत असतो. त्यामुळे ब्रँडेड वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या सेलिब्रेटिंद्वारे आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात. मात्र ती जाहिरात फसवी असेल तर सेलिब्रेटिंवर काय कारवाई होणार याबाबत नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कायद्यात देखील सेलिब्रिटींना अभय मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फसवी जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जबाबदार धरले जाईल, ही बाब कायदा प्रस्तावित असताना नमूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कायदा लागू झाल्यानंतर त्यात सेलिब्रिटिंबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. या पूर्वीच्या कायद्यात देखील अशी तरतूद नव्हती. फसवी जाहिरात केली तर दोषींना दोन वर्ष तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंड केला जाणार आहे. मात्र अशी फसवणूक करणाऱ्यांमध्ये नेमके कोणाला जबाबदार धरले जाईल. याबाबत सविस्तर माहिती कायद्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे सेलिब्रेटींचा वापर करून फसवणूक करणाऱ्या वस्तूंची जाहिरातबाजी सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.

ऑक्सफर्डच्या लशीची भारतातही सुरू होणार चाचणी; पण कधी?

 
''सेलिब्रिटींनी एखाद्या वस्तूची जाहिरात करताना त्याची सत्यता तपासावी. फसवी जाहिरात केली तर त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती घेईल. जाहिरात आणि फसवणूक कशाला म्हणायचे याची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे.'' 
-उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात

''नवीन तरतुदिंमुळे खोट्या जाहिराती करण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. मात्र हे दावे ज्या ठिकाणी चालणार त्या समितीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सिलिब्रिटींवर कारवाई होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.''
 - ऍड. पवनकुमार भन्साळी

फसवी जाहिरात करणाऱ्यांना अशी असेल शिक्षा : 
- पहिल्यांदा फसवी जाहिरात केल्यास दोन वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंड
- दुसऱ्यांदा तोच प्रकार केला तर पाच वर्षाचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपये दंड
- तुरुंगवास आणि दंडासह नुकसान भरपाई देखील द्यावी लागणार
- याबाबत कायद्यातील कलम 89 मध्ये आहेत तरतुदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT