पुणे

पारनेर - देवीभोयऱ्याची अंबिका देवी

CD

टुडे एकसाठी देवी महिमा
आरती पुस्तके साठी पहिल्या पेजवर जाहिरात दिली आहे कृपया घेणे गरजेचे आहे

SPU26B06599
देवीभोयरेची श्री अंबिका देवी

देवीभोयरेची श्री अंबिका देवी देवस्थान
परंपरा आणि भक्तिभाव यांचा अपूर्व संगम
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान!
ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक माहात्म्य आणि अढळ भक्तीचा संगम असलेले देवीभोयरे येथील श्री अंबिका देवी मंदिर महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी माता अंबिका, अशी या देवीची ख्याती आहे. राज्यासह परराज्यांतूनही भाविक भक्तिभावाने मातेच्या दर्शनासाठी येत असतात.


गुजरात, पंजाब आणि पानिपतपर्यंत श्रद्धेची नाळ

अशा या प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेल्या जागृत देवस्थानाचे माहात्म्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, संपूर्ण देशात पसरलेले आहे. गुजरात, पंजाब आणि पानिपत परिसरात स्थायिक झालेल्या अनेक मराठी कुटुंबांचे हे श्रद्धास्थान आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली श्रद्धा, मातेवरील अढळ विश्वास आणि नवसपूर्तीची भावना यांमुळे या देवस्थानाशी भाविकांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.
वर्षभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ असते. मातेच्या चरणी नतमस्तक होताना मनाला लाभणारी शांती, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात.

राज्य सरकारकडून देवस्थानाची दखल

देवस्थानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे देवस्थानच्या विकासाला चालना मिळण्यास मदत झाली असून, भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे.

नवरात्रोत्सवात भक्तीचा जागर

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री अंबिका देवी ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या पावन पर्वानिमित्त सुदाम महाराज शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवी माहात्म्याचे श्रवण, आध्यात्मिक विचारांचे चिंतन आणि भक्तिरसाचा अनुभव घेण्याची ही एक अनमोल पर्वणी ठरत आहे. धार्मिक कार्यक्रमांसह देवीच्या पूजेचेही यू- ट्यूब आणि समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यामुळे दूरवर राहणाऱ्या भाविकांनाही या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होता येत आहे.

प्रमुख रस्त्यांनी जोडलेले देवस्थान

श्री अंबिका देवी मंदिर हे प्रमुख रस्त्यांनी जोडलेले असून, भाविकांना येथे पोहोचणे सुलभ आहे. हे देवस्थान शिरूरपासून सुमारे २७ किलोमीटर, पारनेरपासून १६ किलोमीटर, तर आळेफाट्यापासून बेल्हा-शिरूरमार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर आहे.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांची वाढती संख्या आणि त्यांच्या सोयींचा विचार करून लवकरच नवीन भक्तनिवास व स्वच्छतागृहांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

भव्य पालखी सोहळा
देवस्थान ट्रस्टच्या पुढाकाराने नुकतीच १३ सप्टेंबर रोजी देवीच्या नूतन व सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंगलमय सोहळ्यामुळे मंदिराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे. मातेच्या दर्शनाने भाविकांचे मन प्रसन्न होते आणि भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धा, समाधान व चैतन्य निर्माण होते, अशी भाविकांची भावना आहे.

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी होमहवन व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर दसऱ्याच्या पावन पर्वावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्य पालखी सोहळा संपन्न होतो. ढोल-ताशांचा निनाद, देवीचा जयघोष, भक्तांच्या मुखातील नामस्मरण आणि पालखी दर्शनासाठी जमणारा भाविकांचा महासागर यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. हा सोहळा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा अपूर्व संगमच!
नवरात्रोत्सवाच्या या पावन पर्वावर सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब श्री अंबिका मातेच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे, धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
- शिवाजीराव जाधव, अध्यक्ष, अंबिका माता देवस्थान ट्रस्ट, देविभोयरे
शब्दांकन ः मार्तंड बुचुडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT