पुणे

आंबोलीतील बंधाऱ्याला अज्ञाताकडून नुकसान

CD

पाईट, ता. ४ ः आंबोली (ता. खेड) येथील केटी बंधाऱ्याच्या ढाप्यांना भगदाड पाडून अज्ञाताने नुकसान केले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून, ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा बंधारा वर्ष १९८५मध्ये अंदाजे सुमारे १४ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. त्यानंतर काही वर्षांनी बंधाऱ्यांची पडझड व खालील बाजूने गळती सुरू झाली होती. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी टिकत नव्हते. ही गैरसोय लक्षात घेऊन तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यासाठी प्रयत्न करून दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा कोटींचा निधी मंजूर केला होता. त्याअंतर्गत मे २०२५मध्ये बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने हा बंधारा पाण्याने तुडुंब भरला व नोव्हेंबरमध्ये ढापे बसवण्यात आल्याने आणखीनच पाणीसाठा वाढला. त्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांची जनावरांची पाण्याची व गावातील ग्रामस्थांची घरगुती वापरासाठीची पाणीचिंता उन्हाळ्यापर्यंत मिटली होती.
मात्र, काही अज्ञातांनी डिसेंबर महिन्यात मध्यरात्रीच्या वेळेस बंधाऱ्याच्या ढाप्यांना खालील बाजूने, मध्यभागी छिद्र पाडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. याची दखल घेत संबंधित विभागाने दोनवेळा ही पाणीगळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तरीदेखील वारंवार काही खोडसाळ व्यक्ती बंधाऱ्याच्या ढाप्यांना छिद्र करून नुकसान करीत आहेत. सद्या बंधाऱ्यातील सुमारे अडीच ते तीन फूट पाणी वाहून गेले आहे व ते वाहून जाण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या खोडसाळ व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

बुडीत क्षेत्र शासनाने ताब्यात घ्यावे
बंधारा बांधण्यात आला त्यावेळी बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बुडीत क्षेत्राची भरपाई अदा केली होती. मात्र, तरी देखील गेली अनेक वर्षे या परिसरातील काही शेतकरी त्यांच्या शेती क्षेत्रातील पाणी फुगवटा कमी झाल्यावर वर्षभर काही ना काही पिके घेतात. हे बुडीत क्षेत्र शासनाच्या संबंधित विभागाने ताब्यात घ्यावे, अशीही मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

02725

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

Whatsapp New Feature : तुमच्या पालकांना कळणार तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये काय करताय; आलं Parental Control फीचर, कसं वापरायचं पाहा

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

SCROLL FOR NEXT