amit shah sakal media
पुणे

अमित शहा रविवारी पुण्यात

अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या दिवशी पुण्यात येणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अखेर १९ डिसेंबर रोजी पुणे दौरा निश्‍चीत झाला असून, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकापर्णनाच्या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांना गणेश कला क्रीडा मंच येथे मेळावा घेणार आहेत.

अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या दिवशी पुण्यात येणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर शहरातील व प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची पुढची तारीख मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार आता नवीन तारीख कळविण्यात आली आहे.

भाजपचे सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘‘ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ डिसेंबर रोजी पुण्यात येणार असून, महापालिकेतील शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते गणेश कला क्रीडामंच येथे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वैकुंठभाई मेहता सहकार संस्थेला शहा भेट देणार आहेत.

भाजपकडून मतदारसंघनिहाय बैठक

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा पुण्यात येत असल्याने भाजपने त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय व आघाडी निहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT