Amit Shah Sakal
पुणे

पुणे : अमित शहांच्या सचिवांनी गिरविले अनास्करांकडून धडे

राजकारणातील हा चाणक्य नुकताच राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणी मतदारसंघात आयोजित सहकार परिषदेत आले होते.

सम्राट कदम

पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Minister of Home Affairs)राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यांचा भाजपसह राजकीय वर्तुळातील दबदबा कुणापासूनच लपून राहिलेला नाही. नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi)आजवरच्या प्रवासाचे चाणक्य म्हणून त्यांना ओळखले जाते. केंद्र सरकारने नुकतेच सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. विशेष म्हणजे या महत्त्वपूर्ण मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून शहांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. राजकारणातील हा चाणक्य नुकताच राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणी मतदारसंघात आयोजित सहकार परिषदेत आले होते. याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी हिंदीत भाषण (hindi speech)केले. या अभ्यासपूर्ण भाषणानंतर अमित शहांनी जो निर्णय घेतला तो सर्वांनाच अचंबित करणारा ठरला आहे.

रविवारी (ता.९) पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात खुद्द अनास्करांनी या किश्याला पुष्टी दिली आहे. त्याचं झालं अस, देशाचे पहिले सहकारमंत्री म्हणून अमित शहा लोणी (जिल्हा - नगर) येथे आयोजित सहकार परिषदेला आले होते. २०१४ पासूनच राज्य सहकारी बॅंक असेल किंवा सहकार परिषद असेल यांच्या अध्यक्षपदी अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारातील दांडगा अनुभव, बॅंकींगचे ज्ञान आणि सहकाराविषयची तळमळ पाहता अनास्कर यांना सर्वच पक्षांकडून आदराची वागणूक दिली जाते. म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. लोणी येथे आयोजित परिषदेत अनास्कर यांनी सहकारी बॅंकांसमोरील अडचणी, त्याचा सर्वसामान्य लोकांवर होणारा परिणाम, रिझर्व्ह बॅंकेची चुकीची धोरणे आणि सहकाराचा दबलेला आवाज शहा यांच्या समोर मांडला. त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण आणि सहकाराच्या दांडग्या अनुभवाने अमित शहा प्रभावित झाले.(Pune news)

गुजरातमधील सहकाराचा अनुभव असतानाही अनास्करांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने शहांवर झालेला प्रभाव त्यांना स्वतःला लपविता आला नाही. जेवणाच्या वेळी शहा यांनी अनास्करांशी अनेक विषयांवर चर्चा केली आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन टाकला. अनास्करांच्याच भाषेत सांगायचे ठरले तर ,‘‘मेरी हिंदी अच्छी नही है, लेकिन आपको बताना जरुरी है, असे म्हणत मी भाषण केले. शहांनी ते समजून घेतले. म्हणूनच त्यांनी जेवणावेळीही आमच्याशी संवाद साधला. शहा स्वतः दिल्‍लीला गेले मात्र त्यांनी त्याचे एक सचिव पुण्यात थांबविले. विद्यापीठाजवळील वैकुंठ मेहता सहकारी प्रबंध संस्था (व्यामनीकॉम) येथे संपूर्ण दिवसभर आम्ही चर्चा केली. शहांच्या सचिवाने सर्व गोष्टी समजून घेतल्या, सविस्तर चर्चेनंतर ते दिल्लीला गेले.’’ सहकार क्षेत्राचे ऐकून घेण्याची भूमिका केंद्र सरकारची दिसत आहे. निश्चितच ती स्वागतार्ह असल्याचीही भावना अनास्कर यांनी व्यक्त केली. सहकारातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी अमित शहांच्या सचिवाने अनास्करांकडून गृहपाठ गिरवला असे म्हणायला काही हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT