Amit-Shaha sakal
पुणे

अमित शहा पुण्यात; भाजप करणार शक्ती प्रदर्शन

शहराध्यक्ष मुळीक यांच्या घरी करणार रात्रीचे भोजन

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेची निवडणूक (Corporation Election) काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha)उद्या (रविवारी) पुण्यात असल्याने भाजपने (BJP) शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. महापालिकेतील कार्यक्रमासह गणेश कला क्रीडा मंच येथी मेळाव्यात अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष लागलेले आहे.

नोव्हेंबर महिन्यात अमित शहा यांचा दौरा होणार होता, पण तो अचानक पुढे ढकलण्यात त्यानंतर हा दौरा रविवारी होत आहे. आज (शनिवारी) रात्री शहा पुण्यात मुक्कामी आहेत. रविवारी सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, त्यानंतर चाकण येथील एनडीआरएफचा कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. दुपारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपुजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळण्याच्या लोकर्पण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षाकडून तसेच नगरसेवक व इच्छुक उमेदवरांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शहा पर्वती पायथा येथील घरी जाणार आहेत.

दरम्यान, महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना भाजपने संघटनात्मक बांधनी सुरू केली आहे. तसेच नुकतेच पक्षाच्या नव्या कार्यालयच्या उद्घाटनप्रसंगी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष करत पराभव करून दाखवा असे आव्हान दिलेले आहे. त्यानंतर आता अमित शहा हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने यानिमित्ताने निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या घरी जेवण

शासकीय व राजकीय कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी साडे सातच्या सुमारास अमित शहा हे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी येथील घरी जेवणासाठी जाणार आहेत. पक्षाचे काही नगरेसवक व पदाधिकार उपस्थित रहाणार आहेत. अमित शहा घरी येणार असल्याने मुळीक कुटुंबियांनी जय्यैत तयारी सुरू केली आहे. यावेळी मराठमोळ्या पद्धतीचे जेवण असणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT