Amitabh Bachchan 2000 feet rangoli  
पुणे

Pune : महानायक अमिताभ बच्चन यांची २००० फुटांची रांगोळी

अमिताभ बच्चन वाढदिवसानिमित्त दोन हजार फुटांच्या रांगोळी प्रदर्शन

कृष्णकांत कोबल

हडपसर : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विविध भावमुद्रा सुमारे दोन हजार फुटांच्या रांगोळी प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. बच्चन यांचे चहाते असलेले सासवड येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते, थ्रीडी रांगोळी कलाकार सोमनाथ भोंगळे यांनी ही कलाविष्कार सादर केला आहे. येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

सासवड नगरपरिषदेच्या नगरसेवक सीमा भोंगळे, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड तसेच डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे, सुनील बनकर, संजय शिंदे, अविनाश काळे, शीतल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांच्या विविध चित्रपटातील व्यक्तीरेखा व भावमुद्रांचा अविष्कार या रांगोळीत साकारण्यात आला आहे. सहकलाकार मयुर दुधाळ, प्रिया दुधाळ, अभिषेक शिंदे, रिया भोंगळे, मनाली गायकवाड, शुभम मोरे यांच्यासह एकूण १७ विद्यार्थी कलाकारांनी या कलाकृती प्रदर्शनातून महानायक बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी व पालकांचा या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या अविष्कारासाठी बाराशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून ती साकारण्यासाठी कलाकारांना पाच दिवसांचा कालावधी लागला. हे रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी पुढील चार दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी दिली.

रांगोळी कलाकार भोंगळे यांचे शिक्षण

कोल्हापूर व पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात कलाशिक्षण झाले आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणेच दरवर्षी आषाढी वारीनिमित्त सासवड येथे ते रांगोळी प्रदर्शन भरऊन वारकऱ्यांचे वेगवेगळे हावभाव व प्रसंगचित्र ते रेखाटत असतात. त्यांनी रांगोळीमध्ये आत्तापर्यंत पाच जागतिक विक्रम केले असून चाळीस हजार चौरस फूट एवढी सर्वात मोठी थ्रीडी रांगोळी काढली आहे. हडपसर येथील हे त्यांचे आठरावे प्रदर्शन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामान विभागाच्या नजरेत विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र; तापमानाच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा; महाराष्ट्राला दाखवले वेगळे

Nagpur News: पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान; भर उन्हात कर्तव्य बजावताना वाढला आरोग्याला धोका

Latest Marathi News Live Update : माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Nagpur Crime News: भाजीविक्रेत्या युवकाचा सिनेस्टाईल खून ; जादूमहल चौकातील रस्त्यावर रंगला थरार ; अकरा अल्पवयीन आरोपी ताब्यात

Mumbai Chennai Trains: मुंबई-चेन्नई दरम्यान १६ विशेष गाड्या; सोलापूर विभागातील स्थानकांमार्गे धावणार, काेणत्या स्थानकांवर थांबणार?

SCROLL FOR NEXT