पुणे- वेस्ट इंडिज क्रिकेटपटूला घरी बसविणारे अमितेश कुमार यांची पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
१९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते
२००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय यादव यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. राजेंद्र क्षीरसागर यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रविंद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलीये. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.