MHD26B04983
अमोल गायकवाड
........
मुख्याध्यापक संघ उपाध्यक्षपदी गायकवाड
.........
महूद : सांगोला तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सन २०२६ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील आनंद विद्यालयात पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य उत्तमराव लवटे यांनी काम पाहिले. यावेळी नियंत्रक समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने, सचिव रंगसिद्ध दसाडे, सिद्राम खट्टे, रेवणसिद्ध रोडगीकर, समन्वयक तानाजी माने यांच्यासह आजी-माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. या निवडीबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य गायकवाड यांचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.