Dr.-Amol-Kolhe 
पुणे

पुरातत्व विभागाच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा आदेश तात्काळ रद्द करा - डॉअमोल कोल्हे

डी के वळसे-पाटील

मंचर - लॉकडाऊन काळात कर्मचारी कपात करू नये असे आदेश असतानाही पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कलच्या अंतर्गत असलेल्या सब-सर्कलमधील हंगामी कर्मचारी कमी करण्याचा काढलेला आदेश तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याचे केंद्रीयमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याकडे केली आहे.

पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कलचे अधी‌क्षक पुरातत्व शास्त्रज्ञ (Superintending Archaeologist) डॉ. राजेंद्र यादव यांनी दि. २४ एप्रिल रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशात या कार्यालयांतर्गत येणाऱ्या अकरा उप मंडळातील (sub circle) हंगामी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत असल्याचे म्हटले या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे नमूद करण्यात आले आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार कपात करू नये असे आदेश दिले असताना या पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कलचे अधी‌क्षक पुरातत्व शास्त्रज्ञांनी काढलेला कर्मचारी कपातीचा आदेश हा पंतप्रधानांच्या आदेशाचा सरळसरळ भंग असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री श्री. पटेल व पुरातत्व विभागाच्या महासंचालक श्रीमती उषा शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नर पुरातत्व विभागाच्या उपमंडलातील ६ समूहातील २५० लेणी व अन्य पुरातन स्थळांच्या देखभालीसाठी २७ कर्मचारी होते. सहा महिन्यांपूर्वी त्यात १९ इतकी कपात करण्यात आली होती. आता या नव्या आदेशाने ही कर्मचारी संख्या सहावर आणण्यात येणार आहे. जुन्नर उपमंडलाचा आवाका पाहता ही कर्मचारी संख्या तुटपुंजी ठरणार आहे. याकडे डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री श्री. पटेल व पुरातत्व विभागाच्या महासंचालकांचे लक्ष वेधून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते आदेश मुंबई सर्कलचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ यांना देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT