chakan- talegaon road 
पुणे

अमोल कोल्हे घेणार नितीन गडकरी यांची भेट 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारीत अलाईन्मेटच्या आखणीबाबत संसद अधिवेशन काळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, तळेगाव शहरात भूसंपादनात अडचणी येत आहेत. त्यामुळे तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या रस्त्याचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, कोतवाल व डीपीआर तयार करणाऱ्या कन्सल्टन्ट लायन इंजिनिअरिंगचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत तळेगाव शहराला बायपास करणाऱ्या पर्यायी रस्त्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार पीएमआरडीएच्या रिंगरोडच्या मार्गाने खेड तालुका हद्दीला जोडण्याच्या पर्यायाचा विचार करून नवीन अलाईन्मेट तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. कोल्हे व आमदार शेळके यांनी दिल्या. या संदर्भात पीएमआरडीएशी समन्वय साधून सर्व्हेक्षण करून दोन आठवड्यात नवीन अलाईन्मेट तयार करण्याचे काम पूर्ण करा, १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात संसद अधिवेशन आहे. त्यावेळी आपण व आमदार शेळके या संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावू, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT